Bharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादन
Bharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादन
भरत गोगावले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केलं अभिवादन महाड मधील चवदार तळ्यावर गोगावले कार्यकर्त्यांसह दाखल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली आदरांजली Anchor - शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महाड मधील चवदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भीम अनुयायी यांच्यासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
हे ही वाचा..
महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातिव्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले. अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.