Bharat Gogawale Mahayuti : शिंदे साहेब समजुतदार; चार पावलं मागे पुढे घेणारी व्याक्ती - भरत गोगावले
Bharat Gogawale Mahayuti : शिंदे साहेब समजुतदार; चार पावलं मागे पुढे घेणारी व्याक्ती - भरत गोगावले
"एकनाथजींनी मोठं मन करून थोडा त्याग करावा", असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही म्हटलंय. त्यांनी थोडा त्याग करावा, आम्ही थोडा करून युती टिकवली पाहिजे असं ते म्हणाले. आमचा पक्ष मोठा असल्याने हिस्सा मोठा मिळावा असा आमचा आग्रह असतो असंही ते म्हणाले. तसंच आम्ही जिंकतो ती जागा आम्ही लढवली पाहिजे असा आग्रह असतो असं बावनकुळे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंशी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह संवाद साधला.
जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने त्याग केल्याची अमित शाहांनी आठवण करुन दिली. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमित भाई आणि शिंदेंच्या काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र हे खरं आहे की मुख्यमंत्रीपद हे राज्याचं मुख्य असतं, ते सरकारचा चेहरा आहे. आमचा एकनाथजींना आग्रह असतो की आमचा पक्ष मोठा आहे त्यामुळे आम्हाला हिस्सा थोडा जास्त मिळाला पाहिजे. कुणाचा त्याग किती याचा मीटर लावता येत नाही. एकनाथजींनी मोठं मन करून थोडा त्याग केला पाहिजे, थोडा आम्ही करून युती टिकवली पाहिजे. त्यांना असं वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची जास्त माणसं लढली पाहिजे... ते सगळ्यांनाच वाटतं. मात्र युतीत ताणतणाव ठेवून निवडणुकांना सामोरे जाता येत नाही. ज्याठिकाणी आम्ही जिंकतो ती आम्हीच लढली पाहिजे असा आग्रह आहे.