Bharat Gogawale : मंत्रिपद हुकलं, महामंडळही लांबणीवर; गोगावले म्हणतात पुढच्या वेळी...

Continues below advertisement

रायगड : महायुती सरकार सत्तेतून आल्यापासून मंत्रिपदाने सातत्याने हुलकावणी दिलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं एसटी महामंडळ अध्यक्षपदही आता लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय. आता थोड्या दिवसांसाठी यामध्ये कशाला अडकून बसायचं, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले महामंडळपद भरत गोगावले स्वीकारणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

राज्याच्या विधानसभा निवडणुका या काहीच दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. नेमकी तेच लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, आनंदराव आडसुळ आणि माजी खासदार हेमंत पाटील यांची महामंडळावर वर्णी लावली. त्यानंतर आमदार भरत गोगावलेंनाही एसटी महामंडळपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या गोगावलेंनी मात्र त्यावर विचार करू असा मेसेज दिल्याने त्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

मंत्रिपद अपेक्षित असताना भरत गोगावलेंना एक-दीड महिन्यासाठी महामंडळ देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा मुख्यमंत्र्यांडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यावर भरत गोगावलेंनीही काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्ष ST महामंडळाचे पद स्वीकारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भरत गोगावले म्हणाले की, महामंडळ मिळावं ही आमची मागणी नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी मनधरणी केली. तसा जीआर काढला, ऑर्डरही काढलीय. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी काम करत होतो. थोड्या दिवसांसाठी कशासाठी यामध्ये अडकून बसायचं असा विचार आहे. एसटी महामंडळ स्वीकारायचं की नाही याबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram