Bharat Bandh | भारत बंदचे मुंबई, परभणीत पडसाद | ABP Majha
Continues below advertisement
सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय.. याचा परिणाम मुंबई, परभणी, इंदापूर, पालघरमध्ये पाहायला मिळतोय.
मुंबईतल्या कांजूर मार्ग स्टेशनवर सकाळी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली. तर, तिकडे कुर्ल्यात कार्यकर्त्यांकडून दुकानं बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर, पवईत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. परभणी जिल्ह्यात मात्र भारत बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आलीय. परभणी, पाथरी, मानवत, जिंतूर, पुर्णा असे बहुतांश तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय. अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयातील मुलांनाही सोडून देण्यात आलंय.