Kalyan Fire : कल्याणच्या काटेमानवली परिसरात भांगाराच्या गोदामाला आग, जीवितहानी नाही
कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं. या गोडाऊनच्या बाजूला असलेल्या गॅरेजला देखील या आगीची झळ बसली. आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ गॅरेज चालकाने दोन गाड्या बाहेर काढल्या... घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली..चार अग्नीशमनच्या गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवलं.. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Tags :
Fire Brigade Godown Massive Fire Garage Welfare Fire Control Eastern Katemanwali Wreckage Raudarup Rush To The Spot