Bhandara : अवकाळीमुळे कापणीला आलेल्या भात पिकाला फटका
Bhandara : अवकाळीमुळे कापणीला आलेल्या भात पिकाला फटका भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यात घेण्यात येणारा उन्हाळी भात पीक कापणीला आलेला असताना या अवकाळी पावसामुळं धानाच्या लोंब्या गळून पडल्या आहेत. यामुळं एन हातातोंडाशी आलेलं भातपीक नष्ट झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात अनेक भागात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याअंतर्गत निलज (बु.) येथील गुरुदेव बुधे या युवा शेतकऱ्याच्या शेतात धान कापणीवर आला असताना पावसानं घात केला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतातील कापणीवर आलेल्या धानाचे लोंबे झडले असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे, शेतातील परिस्थिती संगताना युवा शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत. भात पिकालाचा नाही तर, बागायती शेतीलाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर, वीज पडून दोन शेतकऱ्यांची तीन जनावरे मृत पावले आहेत. प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त युवा शेतकऱ्यानं केली आहे.