Bhandara Rain : भंडाऱ्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस, नदी-नाले प्रवाहित
जयदीप मेढे
Updated at:
20 Jul 2024 07:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Rain : भंडाऱ्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस, नदी-नाले प्रवाहित
भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी - नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची रात्री चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे.