Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोग
Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोग
मी एका सदन कुटुंबातील आहे पण नेहमी आम्ही मातीशी जोडलेलो त्याच्यामुळे असं वाटलं की आपण शेतीत नवीन नवीन प्रयोग करावेत त्यात मला पाहून जर इतर महिला प्रेरित होत असतील त्यासाठी मी हा प्रयोग करते मी गेली सात आठ वर्ष शेती करते मी बऱ्यापैकी बागायती शेती केलेली आहे आणि त्यातल्या त्यात बागायती मध्ये आम्ही आता आंतरपीक हा प्रयोग करतोय मी कश्मीरी बोरी मध्ये आम्ही ढेमस लावला मागच्या वर्षी मला प्रचंड नफा झाला कमीत कमी दोन सवा दोन लाखाचा आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्ही त्याच उत्पन्न घेतलं. या वर्षी मी केळांमध्ये टरबूज लावला आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे. सोबतच आम्ही फणसामध्ये ढेमस लावलाय तर दोन्ही उत्पन्न आमचे अगदी चांगल्या प्रकारे निघत आहेत. आता ढेमसाच हार्वेस्टिंग सुरू झालेल आहे आणि टरबुजाच पण सुरू झालेला आहे. टरबूजामध्ये आम्ही युनायटेड नावाची कंपनी त्याचा टरबूज लावलेला आहे. आणि मला एक दोन उत्पादन आहेत आम्ही ते साकोलीच्या मार्केटमध्येच पाठवतो.