ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा मोठा दावा, दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान..
नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा, शरद पवारांनी झिडकारला प्रश्न, सत्तेचा गैरवापर करुन कुणी धार्मिक तेढ निर्माण करतंय का बघा असा सरकारला सल्ला.
आपली वाचाच गेली, शिंदे आणि अजित पवारांना सोबत येण्याच्या नाना पटोलेंच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया...तर राजकारणात कुणीही दुश्मन किंवा दोस्त नसतो, वडेट्टीवारांचं मत...
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी
काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम, शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका...बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानियांचा हल्लाबोल...
मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडेंची सहा महिन्यांत आमदारकीही जाणार, करूणा शर्मा यांचा दावा...निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात करुणांच्या नावाचा उल्लेख केला नसल्यानं कोर्टात लढाई...
सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल...गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू