Bhandara Ajit Pawar Sabha : भंडाऱ्यात 28 तारखेला राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा,अजितदादांची सभा होणार

Continues below advertisement

Bhandara Ajit Pawar Sabha : भंडाऱ्यात 28 तारखेला राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा,अजितदादांची सभा होणार

ही बातमी पण वाचा

Akola : विधानसभेसाठी 'वंचित'च्या निवडणूक आणि समन्वय समित्यांची घोषणा, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) 'ॲक्शन मोड'वर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी रात्री निवडणूक आणि समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक समितीत भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पूंडकर हे सहअध्यक्ष असणार आहेत. हे दोघे समन्वय समितीचेही सदस्य असणार आहेत. तर दोन्ही समित्यांच्या इतर सदस्यांमध्ये अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आणि समन्वय समिती 'वंचित' कडून निवडणूक लढवण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या दोन्ही समित्या उमेदवाराबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत.‌ दोन्ही समित्या निवडणूक प्रचाराच्या तयारीची देखरेख करणार आहे.  सोबतच मीडिया समिती, संशोधन विभाग आणि राज्य कोअर कमिटी यांच्याशी समन्वय साधण्याचं कामही या दोन्ही समित्या करणार आहेत.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर निवडणूक आणि समन्वय समितीच्या 'कॅप्टन' : 

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची 'निवडणूक समिती' ही सर्व शक्तिमान समिती समजली जाते. राज्य आणि प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची रणनीती, उमेदवारांचे आलेले अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम उमेदवारी हे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. त्यामुळे या समितीतील नियुक्त्यांकडे वंचित बहुजन आघाडीसह सर्वच राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकरांनी या समितीच्या अध्यक्षपदी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करीत त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे ‌ या समितीत रेखा ठाकूर यांच्या मदतीला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच पक्षाच्या समन्वय समितीत या तिघांनाही नेमण्यात आलं आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर याच असणार आहेत. तर अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे समन्वय समितीचेसुद्धा सदस्य असणार आहेत.‌ याबरोबरच दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram