Bhalchandra Nemade : आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं; बेताल नेत्यांविरोधात नेमाडेंचा संताप
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेेते भालचंद्र नेमाडे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. आपणच त्यांना निवडून देतो आणि त्याचीच ही फळ आहेत अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्यात.. ते जळगावात बोलत होते.. महापुरुषांविषयी बेताल वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण गढूळ झालं आहे. हे कुठेतरी थांबणं गरजेचे आहे, यासंदर्भात भालचंद्र नेमाडे यांना विचारलं असता त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.