Bhagwant Maan यांचा आनंद द्विगुणित, सात वर्षांनंतर भेटली दुरावलेली मुलं
यशापयशाच्या पलीकडे आपलं एक घर असतं, त्या घरातली माणसं जर तुमच्या यशानं आनंदी असतील आणि तुमच्या आनंदात ते सहभागी असतील. तरच त्या यशाला किंमत असते. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आनंद आज द्विगुणित झालाय. कारण सात वर्षांपासून दुरावलेली त्यांची दोन्ही मुलं आज त्यांना भेटलीत. आज भगवंत मान यांनी पंजाबच्या 17 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या सोहळ्याला एकवीस वर्षांची सीरत कौर आणि 17 वर्षाचा दिलशान ही दोन्ही मुलं उपस्थित होते. 2015 साली भगवंत मान यांनी पत्नी इंदरपीत कौर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ही दोन्ही मुलं आपली आई इंद्रप्रीत कौर यांच्यासोबत अमेरिकेला स्थायिक झाली. आज सात वर्षांनंतर ही दोन्ही मुलं आपल्या वडिलांच्या शपथग्रहण सोहळ्याला खटकड़ कलां गावात पोहोचली. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये मोठा विजय खेचून आणला. त्यानंतर इंद्रप्रीत कौर यांची पहिली प्रतिक्रिया आली होती. त्यावेळी त्यांनी ही आपली दोन्ही मुलं सीरत कौर आणि दिलशान हे भगवंत मान यांच्या शपथविधीला उपस्थित राहतील असं सांगितलं होतं. भगवंत मान यांच्या यशासाठी मी देवाकडे कायमच प्रार्थना केली आहे, यापुढेही करत राहीन अशी भावना इंद्रप्रीत कौर यांनी व्यक्त केली होती.