Bhagat Singh Koshyari : पवार देशातील मोठी व्यक्ती, टीका करायलाच हवी का?, राज्यपालांनी बोलणं टाळलं

राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीला मंजुरी देत नसल्यानं काल शरद पवारांनी राज्यपालांवर खोचक टीका केली होती. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोमणा पवारांनी लगावला. त्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना विचारलं असता शरद पवार ही देशातील मोठी व्यक्ती आहेत. त्यांच्यावर टीका करायलाच हवी का? असा सवाल उपस्थित केलाय. आज राज्यपालांनी पिंपरी-चिंचवडमधील सिम्बॉयसिस महाविद्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola