BEST Election Result | बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे पराभूत, दोन्ही बंधूंना मोठा धक्का

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले होते. 'ठाकरे ब्रँड' म्हणून निवडणुकीत मोठा गाजावाजा झाला, पण आज पहाटे लागलेल्या निकालांमधून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी १९ तर राज ठाकरे यांनी २ उमेदवार दिले होते, पण त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक १४ उमेदवार जिंकले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले. गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी चर्चा होती, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं दिसून आलंय. "ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवरती परिणाम होणार नाही," असे महायुतीकडून सांगितले जात होते आणि ते प्रत्यक्षात उतरले. बेस्टच्या पतपेढीतील हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत १५ हजारांहून अधिक मतदारांनी मतदान केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola