Pune Water logging | एकतानगरमध्ये पाणी, नागरिक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पुण्यातील एकतानगर परिसरात सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकून पडले होते. सध्या नागरिकांना सोसायट्यांमधून बाहेर काढण्यात येत आहे. एकतानगरमधील द्वारका सोसायटीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत पंधरा ते वीस कुटुंबे सुखरूप बाहेर काढण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने एकतानगरच्या रहिवाशांना तात्काळ घर खाली करण्याच्या सूचना देत नोटीस बजावली आहे. परिस्थिती पाहता, महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सुरक्षित ठिकाणी यावे. "प्रत्येक नागरिकाने याठिकाणी महापालिकेला किंवा अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य करण्याची गरज आहे," असे सांगण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola