Belgaum Diwali 2021 : दिवाळीसाठी बेळगावच्या बाजारपेठा गजबजल्या, भारतीय वस्तूंना विशेष मागणी
abp majha web team
Updated at:
30 Oct 2021 05:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्षातील सगळ्यात मोठा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. खरेदीसाठी सध्या बेळगावच्या बाजारात लोकांनी गर्दी केली असून बेळगावात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे जनतेवरील निर्बंध देखील कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळी जोरदार साजरी करण्याचा जनतेचा मानस आहे. बाजारपेठेत दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. चायनीज आकाश कंदील बाजारातून गायब झाले असून स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तूंना लोकांकडून विशेष मागणी आहे. विविध रंगांचे आणि आकारांचे आकर्षक आकाश कंदील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेत. तर बांबू, रंगीबेरंगी प्लास्टिक यापासून तयार केलेले आकाश कंदील उपलब्ध आहेत.