Belgaum Dispute |बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला
Continues below advertisement
बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळलाय. कोल्हापुरात महाराष्ट्राच्या एसटीवर अज्ञातानं दगडफेक केल्याची घटना घडलीय. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांची एसटी वाहतूक बंद करण्यात आलीय. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.
Continues below advertisement