Diwali 2021 : बेळगावात दिवाळीनिमित्त सात प्रकाराचा पैठणी साड्यावापरू 10 फूट उंचीचा आकाश कंदिल
आजपर्यंत आपण कागदाचे,प्लास्टिकचे अनेक आकाश कंदील पाहिले असतील. पण बेळगावात मात्र एक आगळा वेगळा दहा फूट उंचीचा पैठण्या वापरून आकाश कंदील तयार करण्यात आला आहे. हा आकाश कंदील खास करून दिवाळी निमित्त बनविण्यात आला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात प्रकाराचा वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या आकाश कंदील करण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत. हौसेला मोल नाही म्हणतात ना ते अगदी खरेच आहे. येथील महात्मा फुले रोड वरील पैठणी साडीच्या मालकांनी आपल्या दुकानासमोर खास दिवाळी निमित्त हा भला मोठा आकाश कंदील लावला आहे. त्यांच्या दुकानामध्ये विविध पैठण्या उपलब्ध असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हा पैठण्या पासून तयार करून घेतलेला आकाश कंदील लावला आहे.
आतापर्यंत अनेक फॅशन आल्या मात्र पारंपरिक पैठणी साडीची फॅशन आजतागायत सुरु आहे.वेगवेगळ्या सात प्रकारच्या पैठण्या वापरून हा आकाश कंदील तयार करण्यास जवळपास दहा दिवस लागले आहेत. आणि हा कंदील सध्या महात्मा फुले रोडवरील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.