Belgaon : रथोत्सव सुरू असताना रथाला आग, फटाक्याची ठिणगी उडून रथानं घेतला पेट
Belgaon : बेळगावात रथोत्सव सुरु असताना रथाला अचानक आग लागली. श्री जडी शंकरलिंग देवाचा रथोत्सव सुरु असताना ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रथोत्सव सुरु असताना फटाके फोडण्यात येत होते. त्यावेळी फटाक्याची ठिणगी रथावर उडून ही आग लागली. आगीनंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरु झाली.