Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे सातत्याने आरोप होत आहेत. किंबहुना काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याच देखील पाहायला मिळालं आणि यामुळेच आता जिल्ह्याची कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बुधवारी मुंबईत असणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले आणि याच ठिकाणी त्यांनी तातडीने बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण यांना देखील बोलावलं. त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय अजित पवारांना घेतल्याचे पाहायला मिळाले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 40 ते 45 पदाधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलं. या चौकशीच्या माध्यमातून तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची बाब देखील समोर आली. आणि त्यानंतर पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यकारणीवर जोरदार टीका देखील होयला सुरुवात झाली. चौकशीच्या निमित्ताने खुद्द पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील पोलिसांनी चौकशीला बोलावलं होते.