Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
वाल्मिक कराडला (Walmik Karad) खंडणी प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या केज न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान न्यायालयात नेमकं काय घडलं?, याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले.