Beed Dasara Melava : दसऱ्याला बीडमध्ये दोन मेळावे; नारायणगडावर जरांगेंचा मेळावा

Continues below advertisement

Beed Dasara Melava : दसऱ्याला बीडमध्ये दोन मेळावे; नारायणगडावर जरांगेंचा मेळावा 

सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा (madha) विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची यासंदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे. कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad pawar) यांचेकडे रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या (Ajit pawar) अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला.   आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय ही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील तुतारी कडून निवडणूक लढवण्यास प्रयत्नात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत, निवडणुकीत कोणीही येऊ दे आम्हाला फरक पडणार नाही, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली. काही दिवसापूर्वी अजितदादांची जन सन्मान यात्रा माढ्यात आली असता बबनदादा शिंदे यांनी त्यास हजेरी लावत मोठे शक्ती प्रदर्शनी केले होते. आता शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचे हा प्रश्न पडणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram