BEED | अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतील वृक्ष संमेलनाचं उद्घाटन आज | ABP Majha
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतील आणि वन विभागाच्या सहकार्यातून होत असलेल्या बीडमधील वृक्ष संमेलनाला आजपासून सुरुवात होतेय. पालवनच्या उजाड माळरानावर फुललेल्या सह्याद्रीय देवराई प्रकल्पावर हे वृक्ष संमेलन आज आणि उद्या पार पडणार आहे. निसर्गप्रेमी मान्यवरांच्या उपस्थिती हे संमेलन होणार आहे. आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.