Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?

Continues below advertisement

Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेत या मुद्द्यावरुन विरोधकांनी घणाघाती भाषणे करत वाल्मिकी कराड (Walmik karad) आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच आता संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना कशाप्रकारे बेदम मारहाण करण्यात आली होती, याचा उलगडा झाला आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टेम अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आढळून आल्या आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या भागात मारहाण करण्यात आली आहे. मात्र, ते जाळण्यात आलेले नाहीत. संतोष देशमुख यांच्या पाठीवर सर्वाधिक मुका मार बसल्याचे दिसत आहे. त्यांच्या पाठीवर आणि संपूर्ण अंगावर लोखंडी रॉडने मारल्याचे वळ आहेत. ही मारहाण इतक्या क्रूरपणे करण्यात आली होती तिच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या पाठीवर हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत आहेत.  त्यांच्या छातीवर, पायावर आणि डोक्यात अशा सर्व ठिकाणी माराहाण करण्यात आली आहे. मात्र, संतोष देशमुख यांच्या शरीरात कुठेही फ्रॅक्चर आढळून आलेले नाही. किमान दीड तास त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतक्या क्रूरपणे करण्यात आली होती तिच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या पाठीवर हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram