Beed : परळीत चोरट्यांनी धुमाकूळ, खाजेची पावडर टाकत दोन लाख लंपास

परळी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र दररोज समोर येणाऱ्या घटनांवरून दिसुन येते.चक्क शहरातील वैद्यनाथ बँकेच्या परिसरात सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाबरोबर घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक व भितीदायक आहे.आधी खाजेचे पावडर टाकलं अन् अंग खाजवे पर्यंत दोन लाखांची बॅग पळवली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या धक्कादायक प्रकाराबाबत सोमेश्वर सृष्टी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्रभाकर बाळाजी शिंदे ( वय 66 ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.शहरातील एका नामांकित सहकारी बॅंकेच्या परिसरात एका लाल पिशवीत रोख रक्कम दोन लाख दहा हजार व पासबुक होते. अनोळखी तीन जण त्याठिकाणी त्यांच्या बाजूला उभे होते.अचानक प्रभाकर  शिंदे यांना अंगावर पावडर पडल्याचे लक्षात आले व लगेचच अंगाला खाज आली.अंग खाजवण्यासाठी म्हणून त्यांनी आपली लाल पिशवी तिथेच असणार्या खुर्चीवर ठेवली.काही क्षणातच ही पिशवी गायब झाल्याचे दिसून आले.  अज्ञात तीन आरोपींविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola