Pankaja Munde on Karuna Sharma : परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली : पंकजा मुंडे ABP Majha
Continues below advertisement
परळी : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे राहणार शिवाजीनगर यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement