Beed Majalgaon : कोरोनामुळे आठवडी बाजार बंद, निर्णयाबाबत भाजी विक्रेते संतप्त
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 10:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत याच निर्णयाच्या विरोधात आज माजलगाव मध्ये संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजा रस्त्यावर फेकून दिल्या..
आज माजलगाव येथील आठवडी बाजार असल्याने परिसरातील भाजीविक्रेते माजलगाव शहरात आले होते त्यावेळी त्यांना प्रशासनाच्या वतीने आठवडी बाजार बंद असल्याने भाजी विक्री करण्यास मनाई करण्यात आली यावेळी संतप्त झालेल्या या भाजी विक्रेत्यांनी चक्क आपल्या भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या त्यामुळे माजलगावातील मुख्य रस्त्यावर भाज्यांचा सडा पडला होता.