Beed Lok Sabha Booth Capturing : बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप

Continues below advertisement

Beed Lok Sabha Booth Capturing : बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप

बीडमध्ये बोगस मतदाना बाबतचे व्हिडीओ व्हायरल, याच व्हिडीओवरुन शरद पवार गटाचा परळीत बूथ कॅप्चर केला गेल्याचा आरोप,  या व्हिडीओ संदर्भात अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मतदान प्रक्रिया बाधित होत असल्याचे आणि ईव्हीएम मध्ये छेडछाड दाखवणारे  व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये  प्रसारित होत आहेत. यावर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिला आहे. हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024शी संबंधित नाहीत शिवाय इतर राज्यातील काही व्हिडिओ  हे समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत असल्याचं कार्यालयाकडून स्पष्टीकरण. तर बीड लोकसभा मतदारसंघातील वायरल होत असलेल्या  एका व्हिडिओ संदर्भात  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाला  यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालय या व्हिडिओ संदर्भात तपासणी करून संबंधित अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पाठवणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram