
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
Beed News : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने (Santosh Deshmukh Case) जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीड पालकमंत्री झाल्यानंतर आज गुरुवारी (दि. 30) पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले असून बीडमध्ये डीपीडीसीची बैठक (Beed DPDC) पार पडत आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता असून बैठकीस सर्वसामान्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे चुलत भाऊ अजय मुंडे (Ajay Munde) यांना देखील गेटवरच रोखण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यानंतर अजित पवार हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी बैठकीसाठी दाखल झाले.