Doctor Suicide Case: 'त्या सरकारकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार?', Sushma Andhare यांचा सवाल
Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक (Kavadgaon Budruk) येथे एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' स्टाईल (Sholay style) आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. 'पहिल्या दिवशी क्लीन चीट जाहीर केली, तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल?', असा थेट सवाल शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारवर निशाणा साधत विचारला आहे. आमच्या गावच्या लेकीची बदनामी थांबवून संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्यात यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण हा लढा जिंकणार आहोत, कुठेही माघार घेणार नाही किंवा कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही, असे आश्वासन अंधारे यांनी ग्रामस्थांना दिले. मात्र, न्यायासाठी लढताना असा जीव धोक्यात घालणारा वेडेपणा करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement