Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नागपुरातील (Nagpur) शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पाठिंबा दिला आहे. 'आंदोलन उभं करताना कोणाच्या कागदाच्या पाठिंब्यावरती चालवत नाही, एखादा खूप मोठी गाडी घेऊन आला, तो खूप चांगला दिसतो, चष्मा लावतो, म्हणून आपण आंदोलन चालवायचे नसतं,' अशा शब्दात जरांगे पाटलांनी प्रस्थापित नेत्यांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांवर आलेली ही अटीतटीची वेळ असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करत जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखे मोठे नेते अनुपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement