Beed : बीडमधल्या धारुर किल्ल्यावरील तोफगोळे गायब, किल्ला संरक्षित न केल्यास आंदोलनाचा इशारा
बीडमधल्या धारुर किल्ल्यावरील तोफगोळे गायब झाले आहेत.. शिवप्रेमींनी किल्ल्यावर पडलेलं तोफगोळे जमा करुन एका खोलीत ठेवले होते.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवप्रेमी किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गेले असता त्यांना तोफगोळे चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.. पुरातत्व विभागानं किल्ला संरक्षित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिला आहे..