Beed :विरोधकांनी 150 किलोचा उमेदवार म्हणून हिणवलं, त्याच उमेदवाराला कार्यकर्ते डोक्यावर घेऊन नाचले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुकीमध्ये विरोधक कोणते आरोप करतील याचा काही नेम नाही. बीडच्या आष्टी नगरपंचायतीत भाजपकडून आयशा बेग या महिला उमेदवार रिंगणात होत्या. प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आयशा बेग यांचा मुलगा जिया बेग यांना वजनावरुन सातत्यानं हिणवलं. मात्र याच जिया बेग यांच्या आई आयशा बेग या आष्टी नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. मग काय हा विजयोत्सव साजरा करताना कार्यकर्त्यांनी एकशे दहा किलो वजन असलेल्या जीया बेग यांना आपल्या डोक्यावर घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी अगदी नाचत जीया बेग यांना सुरेश धस यांच्या घरी आणलं. बाळासाहेब आजबे यांनी दीडशे किलो उमेदवार म्हणून ज्या उमेदवाराला हिणवले खर तर त्याच उमेदवाराला कार्यकर्त्यांनी तळहातावर झेलत आपला विजयोत्सव साजरा केला.