Beed Crime | बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेला मारण्याचा प्रयत्न, महिला गंभीर जखमी | ABP Majha
एका विवाहित महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बीड शहरातील सायंकाळी पेठ बीड भागात घडली. आरोपी मात्र अद्याप फरार आहे.