धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून 22 मृतदेहांची वाहतूक, अंबाजोगाईतील प्रकार
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना होत असल्याने स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्याने प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे कि प्रसार करायचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.