Beed Railway Special Report : बीड रेल्वेच्या ट्रॅकवर पहिली रेल्वे श्रेयवादाची, प्रकरण काय?

बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर चाळीस वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर पहिली रेल्वे धावली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. रेल्वेच्या श्रेयवादावरून नेत्यांमध्ये चर्चा झाली, तर उपमुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या कामासाठी बीडकरांना जबाबदार धरले. मुख्यमंत्र्यांनी ही रेल्वे गोपीनाथ मुंडे यांना अर्पण करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय.' या प्रकल्पाची मागणी 1830-84 पासून होती आणि 1995 मध्ये तांत्रिक मंजुरी मिळाली. सुरुवातीला 355 कोटींचा असलेला खर्च 4800 कोटींवर पोहोचला. यात केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी पन्नास टक्के वाटा आहे. 2014 नंतर कामाला वेग आला. बीड-अहिल्यानगर दरम्यान 166 किलोमीटर लोहमार्ग पूर्ण झाला असून, बीड-परळी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल. सध्या ताशी 30 किलोमीटर वेगाने धावणारी ही रेल्वे अहिल्यानगर ते बीड प्रवासाला साडेपाच तास घेईल. तिकीट दर फक्त 40 रुपये आहे. 1997 पासून सुरू असलेल्या आंदोलनांनी, विशेषतः आकाशवाणी आंदोलनाने, या स्वप्नपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola