Pakistan Team Quits Asia Cup : पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर? न खेळण्याचा निर्णय?

आशिया कपमधून (Asia Cup) पाकिस्तान (Pakistan) बाहेर पडणार का यावर चर्चा सुरू झाली आहे. UAE विरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश दिल्याचे वृत्त Geo न्यूजने दिले आहे. भारत-पाकिस्तान (India-Pakistan) मॅचनंतर हस्तांदोलन (Handshake) न केल्याने वाद निर्माण झाला होता. सामनाधिकारी पायक्राफ्ट (Pycroft) यांच्यावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना आगामी सामन्यांमधून हटवण्याची मागणी केली होती. मात्र, UAE विरुद्धच्या सामन्यासाठीही पायक्राफ्ट (Pycroft) यांचीच नियुक्ती झाल्याने PCB ने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या PCB चे माजी अध्यक्ष रमेश राजा (Ramiz Raja) आणि विद्यमान अध्यक्ष नक्वी (Naqvi) यांच्यात बैठक सुरू असून, मॅच एक तास उशिरा सुरू करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तान खेळणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola