Beauty Products : महिलांनो, सौंदर्य प्रसाधनं वापरताय? सावधान! काय आहे प्रकरण? ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 12:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदेशी कंपन्यांची मुदत संपलेली सौंदर्यप्रसाधनं कमी किमतीत आयात करून, मग वाढीव दरानं मुंबईतल्या ब्युटी शॉप्समध्ये विकणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून सारा माल ताब्यात घेण्यात आला आहे. ही सौंदर्यप्रसाधनं बाजारात खपवण्यासाठी त्याच्या वापरासाठीची मुदत आणि किमतीच्या आकड्यात फेरफार करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखा युनिट अकराच्या पोलिसांनी एकाच वेळेस मुंबईतील गोरेगाव, क्राॅफर्ड मार्केट आणि दाणाबंदर परिसरातील गोडाऊन्सवर धाडी टाकल्या आहेत. या धाडींमध्ये तीन कोटी 28 लाख 711 रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधनं आणि तेरा लाख 19 हजार 410 रुपयांची रोख रक्कम तसंच इतर मुद्देमाल जप्त केला आहे.