Melghat | मन मोहून टाकणारं मेळघाटचं सौंदर्य! नजर जाईल तिथं हिरवाईचा शालू, आभाळात विविध रंगांच्या छटा...
सध्या मेळघाट, चिखलदरा आणि सातपुड्याचं सौंदर्य अगदी सुंदरतेच्या अत्युच्य शिखरावर आहे. नजर जाईल तिथपर्यंत अगदी हिरवाईचा शालू पांघरलेली सृष्टी, ओसंडून वाहत असलेले धबधबे, पशु-पक्ष्यांचं गुंजारव सर्व काही अगदी मनाला मोहून टाकणारं. मेळघाटाच्या अशाच विविध धुंद रूपातील सृष्टीसौंदर्याचा 'कोलाज' खास 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी. अकोल्याचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार निरज भांगे यांच्या कॅमेऱ्यानं सृष्टीचं हे अलौकिक रूप टिपलं आहे.