Be Positive : Sindhudurg मध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन, कार्यक्रमाला Uday Samant यांची हजेरी

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाच्यावतीने भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला आज जिल्ह्य़ाचे पालकमंञी उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी उपस्थित होते. पालकमंञी उदय सामंत यांनी महोत्सवातील रानभाज्यांची पाहणी करत त्यांचं महत्व जाणून घेतलं तर काही दुर्मीळ रानभाज्या चाखून पाहील्या. या रानभाज्याना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी उपस्थित महिलांना दिलं.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 400 विविध प्रकारच्या रानभाज्यां, औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी बचतगटाच्या माध्यमातून पाककृती स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. विकेल ते पीकेल या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक महिलांसाठी या महोत्सवातून विविध प्रकारच्या रानभाज्या पासून पाककृती स्पर्धेतून कलात्मक गुणांना वाव देण्याची संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram