बालगृहातील 60% हून अधिक विद्यार्थी 10वी-12वी मध्ये पहिल्या श्रेणीत पास,Yashomati Thakur कडून कौतुक
शासनाच्या बालगृहात तसंच अनुरक्षण गृहात असणाऱ्या 574 मुला-मुलींनी दहावीच्या परिक्षेत, तर 209 मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलंय. राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुलं बालगृहात तर विधीसंघर्षग्रस्त बालके पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसंच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवतं.