Be Positive : दिव्यांग मुलांनी बनवल्या बीज राख्या, बीज राखीला परदेशातही मोठी मागणी : ABP Majha

Continues below advertisement

पेण शहरातील आई- डे- केअर या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षांपासून मतिमंद मुलांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये, 18 वर्षांवरील मतिमंद मुलांना प्रशिक्षण देत आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. मतिमंद मुलांच्या मदतीने मेणबत्या, कापडी पिशव्या, पेपर बॅग, कंदील, पणत्या तयार करण्यात येतात. त्यातच, गेल्या काही वर्षांपासून मण्यांच्या राख्या तयार करण्यात येत असून यंदा यामध्ये नवा प्रयोग करण्यात आला आहे. यावर्षी, डॉ. समिधा गांधी आणि आई- डे -केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील यांच्या संकल्पनेतून 'बीज - राखी' तयार करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय करण्यात आला. यासाठी, रक्षाबंधनासाठी तयार करण्यात येणाऱ्या राखीवर फुलांच्या आणि भाजीच्या बिया लावून त्या मातीत पेरून रोपटे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram