BDD Chawl Redevelopment | एकाच व्यासपीठावर महायुती-महाविकास आघाडीचे नेते, श्रेयवादाची लढाई?

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चावीवाटप कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ५५६ लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा चावीवाटप कार्यक्रम पार पडणार आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री वित्त अजित पवार उपस्थित असतील. तसेच, वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात काम सुरू झाले आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला या कार्यक्रमाचे व्यासपीठ नियोजन आणि निमंत्रण पत्रिका मिळाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola