Asia Cup Row: 'भारताने Dubai मध्ये येऊन ट्रॉफी घ्यावी', ACC अध्यक्ष Mohsin Naqvi यांचा प्रस्ताव, वाद चिघळणार?

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. आशिया चषक (Asia Cup) ट्रॉफीच्या हस्तांतरणावरून बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद पेटला आहे. 'बीसीसीआयचे प्रतिनिधी आणि विजेत्या भारतीय संघातल्या खेळाडूंनी Dubai मध्ये येऊन आशिया चषकाचा स्वीकार करावा', असे आशियाई क्रिकेट काउंसिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी म्हटले आहे. नक्वी, जे पीसीबीचे अध्यक्षही आहेत, त्यांनी १० नोव्हेंबरला दुबईत एका सोहळ्याचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यानंतर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने हा वाद सुरू झाला होता. आता पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता असून दोन्ही बोर्डांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola