Asia Cup Trophy Row : आशिया चषक भारताकडे सोपवा, BCCI ची ACC कडे मागणी

Continues below advertisement
आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) आता आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) आशिया चषक ट्रॉफी परत करण्याची अधिकृत मागणी केली आहे. 'आम्ही आशिया चषक ट्रॉफी परत मिळवण्यासाठी एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना अधिकृत इमेल केला आहे,' असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटले आहे. इमेलला उत्तर न मिळाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) दाद मागितली जाईल, असा इशाराही सैकिया यांनी दिला आहे. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर नक्वी ट्रॉफीसह मैदानाबाहेर गेले. ही ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसीच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola