ABP News

BARTI Students Protest: राज्यातील 861 बार्टीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिपची मागणी मंजूर, आंदोलनाला यश

Continues below advertisement

राज्यातील ८६१ संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी गेल्या ५१ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय सचिवांसोबत झालेल्या विद्यार्थ्यांच्या बैठकीत या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या निर्णयावर विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या आंदोलनात लक्ष घातलं होतं. त्यामुळं राज्य सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेऊन बुधवारच्या बैठकीत निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram