Baramti Crime : विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारले ABP Majha

Continues below advertisement

Baramti Crime : विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारले ABP Majha

पुणे : हुंड्यासाठी (Dowry) सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. यासाठी कठोर नियम असले तरीही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो. बारामती तालुक्यात (Baramati Taluka) विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. बारामती (Baramati)  तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली . 




Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram