Baramati Sugar Factory Issue : माळेगाव सहकारी साखर कारखान्यात गोंधळ, राष्ट्रवादी - भाजप आमने समाने

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने विविध विषयांना मंजूरी दिली. विषय मंजूर-मंजूर अशा घोषणा देत संचालकांनी सभेतून काढता पाय घेतला. मोठ्या संख्येनं सभासद हे नाही-नाहीच्या घोषणा देत होते. या गोंधळातच विषय मंजूर करुन सभा गुंडाळण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करुन सभासदांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola