Namo Rojgar Melava पत्रिकेतून शरद पवारांचं नाव गायब, मात्र पवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा

Continues below advertisement

पुणे : बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत चक्क राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलं आहे. साधारण शरद पवारांनी या मेळाव्यासाठी वेळ राखून ठेवल्याची माहिती होती. या मेळाव्याच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च हा दिवस त्यांनी दौरे न ठेवता राखून ठेवला होता. मात्र त्याचंच नाव वगळण्यात आल्याने आता पुन्हा एकचा चर्चेला उधाण आलं आहे. यातच महत्वाची बाब म्हणजे  खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांची कार्यक्रम पत्रिकेत नाव आहेत. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram