Baramati LokSabha : बारामती लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा, कोण मारणार बाजी?
Baramati LokSabha : बारामती लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा, कोण मारणार बाजी?
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी झाली. मात्र अजूनही या निवडणुकीतल्या मतदानाची चर्चा सुरू आहे. एकूण राज्यातील पाचही टप्प्यांचा मतदान झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचा मूड नेमका काय आहे? कोणते कोणते फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले? याविषयी बारामतीतील पत्रकार अमोल तोरणे, सुधीर जन्नू व ज्ञानेश्वर रायते यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्यालयात त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यापुढे दर मंगळवारी ते बारामतीत लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. काय अजून त्यांच्याशी बातचीत केलीय आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने